Dhanshri Shintre
घरातील ओलावा कमी करण्यासाठी डिह्युमिडिफायर वापरा किंवा नसेल तर भांड्यात मीठ ठेऊन शोषून घ्या.
पावसाळ्यात ओलावा वाढतो, त्यामुळे खिडक्या उघडा आणि पंखा चालू ठेवून घरातील हवा सतत खेळती ठेवा.
छत आणि भिंतीतून पाणी गळत असल्यास वॉटरप्रूफिंग करा, गळती थांबवून घर ओलाव्यापासून वाचवा.
भिंतींवरील बुरशी साफ करण्यासाठी व्हिनेगर-पाणी मिसळा आणि मऊ ब्रशने हळूवार स्वच्छ करा.
कपडे आणि वस्तू ओल्या होऊ नयेत, म्हणून हवाबंद डब्यांत ठेवा आणि उंच जागी साठवा.
ओलावा टाळल्याने घर स्वच्छ आणि बुरशीमुक्त राहते, ज्यामुळे श्वसनाशी संबंधित आजार होण्यापासून बचाव होतो.
पावसाळ्यात स्वच्छता ठेवा, ओले कपडे घरात न आणता बूट बाहेर ठेवा, त्यामुळे दुर्गंधी टाळता येते.