Dhanshri Shintre
महिलांचे शरीर पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असते आणि काही आजारांना अधिक प्रभावित होतात, त्यामुळे महिलांनी आरोग्याची काळजी खास पद्धतीने घ्यावी लागते.
आज आम्ही महिलांना जास्त त्रास देणाऱ्या आजारांबाबत माहिती देणार आहोत. चला, या आजारांविषयी सखोल जाणून घेऊन जागरूक होऊया.
मासिक पाळी, बाळंतपण आणि पोषणातील कमतरतेमुळे महिलांमध्ये अनेकदा कमजोरी आणि अशक्तपणा जाणवतो, त्यामुळे योग्य काळजी आवश्यक आहे.
महिलांमध्ये संधिवाताचा धोका असतो, ज्यामुळे सांध्यात वेदना होतात. यावर मात करण्यासाठी मासे, संपूर्ण धान्य, वाटाणे आणि बिया खाणं फायदेशीर ठरते.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा हार्मोनल आजार असून, ताणतणावामुळे हा त्रास महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येतो.
आजकाल मधुमेहाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अनेक महिला प्रभावित होतात. यासाठी साखरेची पातळी नीट नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.