Kitchen Tips : रोज रोज चॉकअप होणारे सिंक वैताग देतयं? घरच्या घरी करा हा सोपा उपाय

Saam Tv

चॉकअप झालेले सिंक

किचनमध्ये भांडी घासणे सोपे असते पण चॉकअप झालेले सिंक साफ करण म्हणजे मोठी डोकेदुखी. उरलेले अन्नाचे कण,चहापत्ती,छोटे छोटे भाज्यांचे तुकडे ड्रेनेजमध्ये साचत जातात. काही दिवसातच सिंक चॉकअप होतं.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

दुर्गंधी

मग त्यातून येणारी दुर्गंधी ती वेगळीच. पण आता घरातच असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने सिंक चुटकीसरशी स्वच्छ करता येईल कसं? जाणून घ्या.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

बेकिंग सोडा आणि पांढरे व्हिनेगर

सिंकमधले पाणी काढून त्यात एक कप बेकिंग सोडा टाका. त्यानंतर लगेचच पांढरे व्हिनेगर ओाता. या दोन्ही गोष्टी मिसळतील आणि फेस तयार होईल. फेस तयार झाला की ड्रेनवर १५- २० मिनिटे झाकण ठेव. गरम पाणी ओता. यामुळे घाण एकदम स्वच्छ होईल.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

उकळते पाणी आणि डिश सोप

सिंक चॉकअप हे अनेक वेळा तेलामुळे होतात. सिंकमध्ये ३-४ चमचे डिशवॉश सोप टाका. त्यानंतर ड्रेनवर उकळते पाणी ओता. यामुळे सगळी घाण निघून जाईल.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

मीठ आणि बेकिंग सोडा

चॉकअप झालेले सिंक मोकळे करण्यासाठी मीठ आणि बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे. मिक्स केलेले मीठ आणि बेकिंग सोडा सिंकमध्ये ओता. रात्रभर तसेच ठेवून सकाळी गरम पाणी ओता.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

प्लंजरचा वापर

कोणतेही उपाय काम करत नसतील तर स्पलंजरच्या मदतीने घाण स्वच्छ करू शकता. सिंकमध्ये गरम पाणी ओतून जोर लावून पंप वर- खाली करा . घाण स्वच्छ होईल.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

कास्टिक सोडा

जास्त चॉकअप असल्यास कास्टिक सोड्याचा तुम्ही वापर करू शकता. पाण्यात मिसळून सिंकमध्ये टाका आणि काही वेळानंतर त्यावर पाणी ओता. हा सोडा हाताळताना प्रचंड काळजी घ्या.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

चॉकअप टाळण्यासाठी

चॉकअप टाळण्यासाठी जाळीचा वापर करा. कचरा टाकू नका. तेल आणि तूप सिंकमध्ये टाकणे टाळा.

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | PINTREST

Health Care : रोज मध्यरात्री झोपेतून खडबडून जागे होताय? शरीराकडून दिल्या जाणाऱ्या या संकेताकडं दुर्लक्ष करणं ठरेल घातक

SLEEP HEALTH | META AI
येथे क्लिक करा