Sakshi Sunil Jadhav
आषाढ महिना सुरु झाला की, मुलींना माहेरी बोलावून तिला खाऊ घालण्याची परंपरा पार पाडली जाते.
मराठवाड्यात आषाढ महिन्यात विविध पदार्थ तळले जातात.
आखाड किंवा आषाढ महिन्यात तिखटाच्या पुऱ्या, गोड पुऱ्या आणि दही-भात असा नैवेद्य तयार केला जातो.
तिखट पुऱ्या करताना ज्वारीतं पीठ, कणीक, बेसन, मिरच्या, ताक, धणे पूड, कोथिंबीर, मीठ,तेलाचा वापर करावा.
पीठ मळून घ्या. त्यात मिक्सरमधून बारीक केलेली मिरची धने पूड कोथिंबीर मीठ आणि ताकाचा वापर करुन पीळ मळा. गरम तेलात पुऱ्या तळून घ्या.
कणिक, गुळ, दूध, पाणी, तेल इ.
गुळ पाण्यात भिजवून कणिक मळा. त्यात दुधाचा वापर करून घ्या.
आता पूऱ्या लाटून गरम तेलात छान टम्म फुगवून घ्या.