Raw Banana Fry Recipe: भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

Dhanshri Shintre

चिप्स

दक्षिण भारतात कच्च्या केळीचा उपयोग भाजी, कोफ्ते, स्टिर फ्राय, चिप्स, करी आणि स्टूमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

कृती

कच्ची केळी सोलून मध्यम जाडीने उभी चिरा आणि पाण्याने भरलेल्या भांड्यात तुकडे टाका, फार पातळ-जाड नको.

पेस्ट तयार करा

हिरवी मिरची, आले आणि लसूण एकत्र वाटून पेस्ट तयार करा, कांदा बारीक चिरुन वाटून घ्या.

जिरे, उडीद डाळ घाला

एका खोल तव्यावर तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे व उडीद डाळ घालावी. डाळ सोनेरी होताच मिरची-आले-लसूण पेस्ट टाका.

हळद मिसळा

कच्च्या केळीचे पाणी काढून टाका, नंतर केळी कढईत घालून त्यात हळद मिसळा आणि हलके परतून घ्या.

मीठ घाला

मीठ सारखं पसरवा आणि मध्यम आचेवर केळी पूर्णपणे मऊ व शिजेपर्यंत हलवून तळत राहा.

कांद्याची पेस्ट घाला

बारीक चिरलेली मिरची व कांद्याची पेस्ट घालून ती जास्त आचेवर परतत कॅरॅमलाइज होईपर्यंत शिजवा.

सर्व्ह करा

गरम मसाला आणि लाल तिखट टाका, मग मंद आचेवर परतत राहा जोपर्यंत मिश्रण घट्ट आणि एकसंध होईपर्यंत आणि सर्व्ह करा.

NEXT: डोसा-इडली नाही, पुरीसोबत खा 'बॉम्बे चटणी', १० मिनिटांत तयार होणारी झटपट रेसिपी

येथे क्लिक करा