Dhanshri Shintre
बॉम्बे चटणी ही अशी चविष्ट साईड डिश आहे, जी इडली, डोसा, पुरी किंवा रोटीसोबत स्वादात खास भर घालते.
इडली, डोसा यांसारख्या पारंपरिक टिफिनसोबत नेहमीची चटणी कंटाळवाणी वाटत असेल, तर ही सोपी बॉम्बे चटणी नक्की ट्राय करा.
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आले यांना बारीक चिरून चटणीसाठी तयारी करून घ्या.
मध्यम आचेवर पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहरी, जिरे, उडीद डाळ, चणाडाळ आणि लाल मिरची परतवा.
बिया काढून हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आले घालून ३० सेकंदपर्यंत सुगंध येईपर्यंत परता.
आता ¾ कप चिरलेला कांदा घालून नीट मिसळा आणि कांदा पारदर्शक होईपर्यंत परता.
टोमॅटो, हळद आणि मीठ घाला, कांदा-टोमॅटो नीट मिसळा आणि सुमारे एक मिनिट शिजवा.
टोमॅटो मऊ होईपर्यंत झाकण ठेवून ५-८ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
टोमॅटो शिजताना, एका भांड्यात ३ चमचे बेसन आणि अर्धा कप पाणी मिसळून चांगली स्लरी तयार करा.
गुठळ्या नसाव्यात म्हणून चांगले फेटा, नंतर उरलेले २½ कप पाणी घालून गुळगुळीत करा.
टोमॅटो मऊ झाल्यावर बेसनाचे मिश्रण पॅनमध्ये टाका आणि नीट एकजीव होईपर्यंत मिसळा.
९-१० मिनिटे बॉम्बे चटणी घट्ट होईपर्यंत शिजवा. नंतर लिंबाचा रस आणि २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळा.
ही स्वादिष्ट बॉम्बे चटणी डोसा, इडली, पुरी, चपाती, रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.