ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने प्रत्येकजण बाहेरगावी जात आहे.
प्रवास करताना सर्वात सामान्य समस्या दिसून येते ती म्हणजे उलट्या होणं.
तुमच्याही घरातील सदस्यांपैंकी एका व्यक्तीला तरी बसने किंवा कारने प्रवास करताना उलट्या होतात.
कायम लक्षात ठेवा की, ज्यांना उलटीचा त्रास होतो त्यांनी जेवण झाल्यानंतर लगेच प्रवास करु नये.
प्रवास करण्याअगोदर किंवा प्रवासादरम्यान मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन करु नये.
प्रवास करताना शक्य होईल तितके पाणी अधिक प्यावे.
अनेकांना एसीच्या हवेने सुद्धा उलटीचा त्रास होतो,अशावेळी एसीऐवजी कारची खिडकी उघडी ठेवावी. जेणेकरुन फ्रेश हवा तुम्हाला घेता येईल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.