Sakshi Sunil Jadhav
श्रावण महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी येत्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी असणार आहे.
संकष्ट चतुर्थी ही गणपतीची उपासना करण्याची खास तिथी असते. तिला ‘अंगारक’ संकष्ट चतुर्थी म्हणतात.
अंगारक चतुर्थी ही विशेष पुण्यदायी मानली जाते. या दिवशी व्रत, पूजा आणि दान केल्यास गणपती बाप्पाची कृपा अधिक लाभते.
श्रद्धेने उपवास, गणेशपूजा व मंत्रजप केल्यास घरात सुख-समृद्धी, धन-धान्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
या संकष्टीचा उपवास सकाळ पासून चंद्रदर्शनापर्यंत केला जातो. तुम्ही यात फळहार घेऊ शकता.
दुर्वा, लाल फुले, मोदक, कुंकू-हळदीने गणेशाची विधीपूर्वक पूजा करावी. गणपती अथर्वशीर्ष किंवा ‘ॐ गं गणपतये नमः’ जप करावा.
तुम्ही या दिवशी लाल कपड्यात गणपती मूर्तीला तांदूळ, दूर्वा अर्पण करुन गोड पदार्थांचा नैवेद्य देवू शकता.
शक्य असल्याल तुम्ही गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैशाचे दान करून पुण्यलाभ मिळवू शकता.