Vishal Gangurde
सकाळी नाश्त्यात चवदार खायची इच्छा असेल तर व्हेज फ्रँकी चांगला पर्याय आहे.
फ्रँकी बनविण्यासाठी कप गव्हाचे पीठ, मैदा, दही, मीठ इत्यादी साहित्य लागते. तसेच मसाला बनविण्यासाठी देखील साहित्य लागेल.
एका पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यानंतर जीरं, मोहरी, कांदा, आलं आणि लसूण पेस्ट करावी. त्यात लाल तिखट, हळद टाकावे.
पुढे त्या मसाल्यात उकडलेले बटाटे मिक्स करावेत. चवीनुसार मीठ टाकावे. त्यानंतर मसाला तयार झाला असेल.
व्हेज फ्रँकी बनविण्यासाठी पोळी घ्यावी. त्यावर टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी लावावी. त्यानंतर त्यावर फ्रँकीचा मासाला लावावा.
पुढे चिरलेली शिमला मिरची, उभा चिरलेला टोमॅटो आणि कांदा हा रोलमध्ये भरा.त्यानंतर कोथिंबीर टाकावी आणि रोल गोल करावा.
तयार केलेला रोल तव्यावर गरम करावा. तुमची फँक्री तयार झाली आहे. तुमची टोमॅटो सॉससोबत फ्रँकी खाऊ शकता.