Manasvi Choudhary
वांगीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर भजी बनवा
वांगी भजी बनवण्याची रेसिपी अंत्यत सोपी आहे.
वांगी भजी बनवण्यासाठी मध्यम आकाराची वांगी, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, मसाला, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्या गोल पातळ चकत्या करून घ्या.
नंतर यावर मिठ, हळद आणि मसाला घालून एकजीव करा.
थोडेसे पाणी घालून सर्व मसाला एकत्रित वांगीच्या कांपावर करा.
एका डिशमध्ये तांदळाचे पीठ घ्या त्यात हे मसाला काप मिक्स करा.
गॅसवर गरम तेलामध्ये हे काप हळू हळू सोडा.
हे काप लगेच शिजतात यामुळे २ ते ३ मिनिटांनी काप उलट करून थोडे तेल तव्याभोवती सोडा.
तळलेले वांग्याचे तुकडे म्हणजे वांग्याची भजी. अश्याप्रकारे खाण्यासाठी वांग्याची चविष्ट भजी तयार आहे.