Vada Pav Chutney Recipe: गरमा गरम वडापावसोबत खा लसणाची लाल चटणी, घरी बनवण्याची रेसिपी सोपी

Manasvi Choudhary

लसणाची चटणी

वडापाव अन् लसणाची लाल सुकी चटणी हे समीकरण प्रसिद्ध आहे.

वडापाव चटणी

गरमा गरम वडापावसोबत लाल लसणाची चटणी चव देते.

सोपी रेसिपी

वडापावची चटणी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

लसणाची लाल चटणी बनवण्यासाठी बेसन,हळद, मीठ, जिरे, पांढरे तीळ, कश्मिरी लाल मिरची, लाल तिखट मसाला, तेल, लसूण पाकळ्या हे साहित्य घ्या.

साहित्य मिक्स करा

सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि थोडे पाणी घालून मिक्स करा.

बेसनात मिश्रण तळा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये बेसन मिश्रण तळून घ्या. नंतर यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून तळा.

मिश्रण वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यात जिरे, पांढरे तीळ आणि तळून घेतलेले मिश्रण बारीक करून घ्या.

लाल मिरची पावडर घाला

मिश्रणात तळलेला चुरा घाला आणि मिश्रण बारीक करा. संपूर्ण मिश्रणात कश्मिरी लाल मिरची पावडर, मसाला आणि मीठ घालून बारीक करा.

लसणाची सुकी चटणी तयार

अशाप्रकारे वडापावची लाल सुकी लसणाची चटणी तयार आहे.

Vada Pav Chutney Recipe

next: Medu Vada Recipe: अवघ्या १० मिनिटांत बनवा कुरकुरीत मेदूवडा, रेसिपी लगेच लिहून घ्या

येथे क्लिक करा..