Manasvi Choudhary
मेदूवडा हा लोकप्रिय साऊथ इंडियन पदार्थ आहे.
मेदूवडा नाश्त्याला घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
मेदूवडा बनवण्यासाठी प्रथम उडीद डाळ ३ ते ४ वेळा पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या.
नंतर मिश्रणात पाणी घालून ३ ते ४ तास झाकून ठेवा. यानंतर ३ तासांनी त्यातील पाणी काढून टाका.
मिश्रणाला मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या.नंतर मिश्रण एका चमच्याने ढवळून घ्या.
मिश्रणात जीरे, कडीपत्त्याचे बारीक तुकडे , कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून ते सर्व मिश्रण परत एकदा छान ढवळून घ्या.
नंतर हाताला थोडे पाणी लावून त्या मिश्रणाचा एक गोळा घेऊन मध्यभागी होल पाडून तो हळूच तेलामध्ये सोडा.
नंतर वडे सोनेरी रंग येईपर्यत छान तळून घ्या. अशाप्रकारे कुरकुरीत मेदूवडा सर्व्हसाठी तयार आहेत.