Manasvi Choudhary
बटाटा वडा घरच्या घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
बटाटा वडा बनवण्यासाठी बटाटे, मिरची, कोथिंबीर, आलं, बेसन, सोडा, हळद, मीठ, मसाला, मोहरी, कडीपत्ता हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्या.
हिरवी मिरची, अद्रक याची पेस्ट करून घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी कडीपत्ता आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या
उकडलेले बटाटे स्मॅश करा. नंतर या मिश्रणात उकडलेले बटाटे घालून मिश्रण चांगले परतून घ्या.
अशाप्रकारे तयार बटाटा भाजीचे गोल वडे तयार करून घ्या.
दुसऱ्या बाजूला एका भांड्यात बेसन, हळद, मीठ, मसाला, सोडा आणि पाणी हे मिश्रण करून घ्या.
नंतर या मिश्रणात बटाटा वडे घालून गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये तळून घ्या