Siddhi Hande
उपवासाची साबुदाणा खिचडी ही प्रत्येक महाराष्ट्राच्या घरात बनते. प्रत्येकाची खिचडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते.
साबुदाणा खिचडी अनेकदा चिकट होते. यासाठी ही टीप वापरा.
साबुदाणे कमीत कमी ५-६ तास भिजत ठेवायचे आहे. साबुदाणे भिजत टाकल्यानंतर त्यात जास्त पाणी टाकू नका. यामुळे खिचडी चिकट होते.
भिजवलेले साबुदाणे, मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, तेल, उकडलेले बटाटे
सर्वात आधी तुम्हाला मिरची मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे.
कढईत थोड तेल टाका. त्यात मिरचीची पेस्ट टाका. यामध्ये उकडलेले बटाटे छान कुस्करुन घ्या.
यानंतर बटाटे परतून झाल्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे टाकून मिक्स करा.
यानंतर वरुन शेंगदाण्याचा बारीक कूट टाका. हा कूट चांगला मिक्स करा.
कढईवर ५ मिनिटे झाकण ठेवून खिचडी छान शिजू द्या. यानंतर तुम्ही खिचडी खाऊ शकतात.