Manasvi Choudhary
पावसाळ्यात मिळणारी आघाडा ही रानभाजी पौष्टिक असते.
आघाडीची भाजी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. पचनक्रियेच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी आहारात कुरडूच्या भाजीचे सेवन करणे फायदेशीर आहे.
आघाडाची भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. ही भाजी चवदार लागते.
आघाडाची भाजी बनवण्यासाठी आघाडीची कोवळी पाने, देठ, तेल, जिरे, मोहरी, कांदा, लसूण, हिरवी मिरची, लाल मसाला, मीठ, बेसन हे साहित्य घ्या.
सर्वातआधी आघाडाची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा चांगला परतून घ्या.
त्यानंतर बारीक चिरलेली भाजीला फोडणी द्या. भाजी शिजवताना त्यात पाणी घालू नका. वाफेवर भाजी शिजवली तर भाजीची चव आणि त्यातील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहतात.
भाजीवर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्या . अशाप्रकारे घरच्या घरी आरोग्यासाठी फायदेशीर असणारी आघाडाच्या भाजीची रेसिपी तयार होईल.