Manasvi Choudhary
उन्हाळ्यात करवंदाची चटणी खायला सर्वांनाच आवडते.
करवंदाची चटणा घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
करवंदाची चटणी बनवण्यासाठी करवंद, लसूण पाकळ्या, आले, जिरे, गूळ, मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या हे साहित्य घ्या.
प्रथम करवंद स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्याच्या फोडी करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.
चटणी बनवण्यासाठी लागणारे इतर सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात चिरलेले करवंद आणि इतर सर्व साहित्य टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या.
अशाप्रकारे झटपट, जेवताना,जेवणाची लज्जत वाढवणारी, आंबट गोड, करवंदाची चटणी तयार आहे.