Besan Barfi Recipe: हलवाईच्या दुकानासारखी बेसन बर्फी घरच्या घरी बनवा, वाचा सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी

Dhanshri Shintre

भारतीय मिठाई

बेसन बर्फी ही लोकप्रिय भारतीय मिठाई असून ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची ठरते.

बेसन बर्फी

सण असो किंवा रोजचा दिवस, बेसन बर्फी ही गोड सहज बनवून कधीही स्वाद घेण्याजोगी मिठाई आहे.

रेसिपी

सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरीच स्वादिष्ट बेसन बर्फी बनवू शकता. चला त्याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

बेसन, साखर, तूप, दूध, सुकामेवा, वेलची पावडर, रवा.

कृती

एका जाड पॅनमध्ये १२० ग्रॅम तूप गरम करा, त्यात २ टेबलस्पून रवा टाका आणि १ मिनिट हलवत परतून घ्या.

बेसन घाला

यानंतर २१० ग्रॅम (२ कप) बेसन घालून मिक्स करा आणि मध्यम आचेवर ३-४ मिनिटे सतत ढवळत परतत राहा.

सोनेरी होईपर्यंत परता

३-४ मिनिटांनी गॅस मंद करा आणि बेसन गडद सोनेरी होईपर्यंत परता, यावेळी तूप सुटून मिश्रण थोडं सैल वाटू लागेल.

साखरेचा पाक

एका पॅनमध्ये २०० ग्रॅम साखर आणि अर्धा कप पाणी घालून मध्यम आचेवर उकळा, साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत सतत ढवळा.

वेलची पावडर मिसळा

बेसन थोडं गरम आणि सैलसर असावं. त्यात ¾ चमचा वेलची पावडर टाकून नीट मिसळा.

साखरेचा पाक ओता

यानंतर साखरेचा पाक कोमट बेसनात घालून दोन्ही एकजीव होईपर्यंत नीट मिसळा.

ट्रेमध्ये ओता

ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओता, काजू घाला, स्पॅटुलाने थोडं दाबा आणि सेट होण्यासाठी थंड करा.

सर्व्ह करा

बर्फी थोडी उष्ण राहिल्यावर तुकडे करा आणि लगेच सर्व्ह करून चविष्ट बेसन बर्फीचा आनंद घ्या.

NEXT: अक्रोडाचा गुळगुळीत हलवा, मेंदूची शक्ती वाढवणारा पारंपरिक स्वाद आजच ट्राय करा

येथे क्लिक करा