Tomato Rice Recipe: सोप्या पद्धतीनं घरीच फक्त १० मिनिटांत बनवा टोमॅटो भात, सर्वजण चाटून पुसून खातील

Manasvi Choudhary

टोमॅटो भात

टोमॅटो भात साऊथ इंडियन प्रसिद्ध पदार्थ आहे.

सोपी रेसिपी

टोमॅटो भात घरी बनवण्याची रेसिपी आज आपण जाणून घेऊया.

साहित्य

टोमॅटो भात बनवण्यासाठी तांदूळ, टोमॅटो, तेल, मोहरी, जिरे, हळद, लाल मसाला, धनापावडर, मीठ हे साहित्य घ्या.

tomato

तांदूळ स्वच्छ धुवा

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा. यानंतर टोमॅटो धुवून बारीक तुकडे करा.

जिरे, मोहरीची फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे घाला नंतर यात टोमॅटो, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि मीठ घाला.

मिश्रणात गरम पाणी घाला

संपूर्ण मिश्रणात भिजवलेले तांदूळ घालून गरम पाणी घाला. मिश्रणात चवीनुसार मीठ घालून झाकण लावा आणि शिजवून घ्या.

टोमॅटो भात

अशाप्रकारे चविष्ट टोमॅटो भात सर्व्हसाठी तयार आहे.

next: Fansachi Bhaji: कच्या फणसाची मसालेदार भाजी, फक्त १० मिनिटांत बनवा

Fansachi Bhaji Recipe
येथे क्लिक करा...