Homemade Curd : घरच्या घरी दही कसे बनवावे? जाणून घ्या सोपी पध्दत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दही

दही हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच पचनासाठी हे उपयुक्त असून रोजच्या आहारात महत्त्वाचे आहे. घरी बनवलेले दही शुद्ध आणि चविष्ट असते.

Curd | GOOGLE

दूध उकळणे

एक मोठे भांडे घ्या त्यात दूध गरम करण्यास ठेवावे. दूध मध्यम आचेवर चांगले उकळून घ्या. जाडसर हवे असल्यास मंद आचेवर १५ ते २० मिनेटे उकळून घ्या. दूध नीट उकळले की गॅस बंद करा.

Milk | GOOGLE

दूध कोमट करणे

दूध खूप गरम नसावे. बोट घातल्यावर सहन होईल इतके कोमट असावे.

Milk | GOOGLE

विरजण घालणे

एका वाटीत फ्रेश विरजण घेऊन ते चांगले फेटून घ्या. फेटून घेतलेले विरजण कोमट दुधात टाकून हलक्या हाताने मिक्स करुन घ्या.

Virjan | GOOGLE

सेट करणे

आता तयार केलेल्या मिश्रणाच्या भांड्यावर झाकण ठेवून ते उबदार ठिकाणी सेट होण्यासाठी ठेवून द्या.

Curd | GOOGLE

दही घट्ट बसवणे

रात्रभर दही सेट होण्यास ठेवावे. ६ ते ८ तासांत दही घट्ट बसते. हिवाळ्यात दही घट्ट बसण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो.

Curd | GOOGLE

फ्रिजमध्ये ठेवाणे

दही घट्ट झाल्यावर ते फ्रिजमध्ये ठेवावे. त्यामुळे दह्याचा आंबटपणा वाढत नाही.

Curd | GOOGLE

टिप्स

जास्त विरजण घातल्यास दही आंबट होते. तसेच दूध पूर्ण जाड असेल तर दही जास्त घट्ट बसण्यास मदत होते.

Tips | GOOGLE

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Homemade Butter Loni | GOOGLE
येथे क्लिक करा