Vange Batata Bhaji: लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी झणझणीत वांगा बटाटा भाजी घरी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

वांगा बटाटा भाजी

अनेक भागात लग्न कार्यात वांगा बटाटा ही भाजी प्रसिद्ध आहे. खास लग्नसोहळ्यात जेवणात वांगा बटाटा भाजी बनवतात.

Vange Batata Bhaji

सोपी रेसिपी

त्याच पद्धतीची वांगा बटाटा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी वांगा बटाटा भाजी बनवू शकता.

Vange Batata Bhaji

साहित्य

वांगा बटाटा भाजी बनवण्यासाठी वांगी, बटाटे, तेल, मोहरी, कढीपत्ता, जिरे, हिंग, कांदा, हळद, मसाला, मीठ, शेंगदाणा, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.

Vange Batata Bhaji

वांगी- बटाटे धुवून घ्या

सर्वातआधी वांगी आणि बटाटे स्वच्छ धुवून घ्या नंतर त्यांना चौकोनी आकारात कापा. कापलेली वांगी आणि बटाटे काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवा.

Vange Batata Bhaji

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला. नंतर या मिश्रणात बारीक कांदा कापून टाका. बटाटे चांगले परतून घ्या म्हणजे लवकर शिजतील.

Fodni

बटाटेे शिजवून घ्या

कढईला झाकण लावून संपूर्ण मिश्रण शिजवून घ्या. बटाटे अर्धवट शिजल्यावर त्यात कापलेली वांगी घाला. या संपूर्ण मिश्रणात हळद, लाल मसाला, मीठ हे घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.

potato | yandex

कढईवर झाकण ठेवा

भाजी चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घाला. कढईवर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या.भाजी शिजल्यावर झाकण काढून टाका नंतर त्यात शेंगदाणा कूट घाला. शेंगदाणा कूट भाजीमध्ये छान मिसळून घ्या. अशाप्रकारे तुमची चमचमीत वांगा बटाटा भाजी तयार होईल.

Vange Batata Bhaji

next: Kitchen Cleaning Tips: किचन बेसिन कसा साफ करायचा, ही आहे सोपी ट्रिक

येथे क्लिक करा...