Manasvi Choudhary
आंबोळी हा कोकणातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. इडली आणि डोसा सारखा असणारा हा पदार्थ चविष्ट आहे.
तुम्ही देखील घरच्या घरी सहज आंबोळी बनवू शकता. आंबोळी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मऊ, लुसलुशीत आंबोळी करण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
आंबोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे पाच ते चार तास पाण्यात भिजत घालावे.
नंतर हे संपूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये वेगवेगळे बारीक वाटून घ्या त्याची पेस्ट करा. मिश्रण थोडे जाडसर ठेवा.
आता हे वाटलेले तांदूळ आणि उडीद डाळ हे एकत्र करा आणि पुन्ह ६ ते ७ तास आंबवण्यासाठी ठेवा. यामुळे पीठ छान फुलून येईल.
सकाळी संपूर्ण मिश्रण मिक्स करा आणि त्यात चवीनुसार मीठ मिक्स करा गॅसवर पॅनमध्ये हे मिश्रण गोलाकार पसरवून घ्या दोन्ही बाजूने आंबोळी खरपूस होईल असं परतून घ्या.
तीन ते चार मिनिटे झाकण लावून आंबोळी शिजवून घ्या. अशाप्रकारे कोकणी स्टाइल आंबोळी तयार होईल.