Manasvi Choudhary
अनेकांना महाराष्ट्रीयन स्पेशल थालीपीठ पदार्थ आवडते. मात्र ही रेसिपी घरी बनवता येत नाही.
भाजणीचं थालीपीठ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
थालीपीठ बनवण्यासाठी तांदूळ, बाजरी, ज्वारी, गहू, उडदाची डाळ, चणा डाळ, धणे, जिरे हे साहित्य घ्या.
भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम धान्य एकत्र खरपूस भाजून घ्या. भाजलेले सर्व धान्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
यानंतर कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या ती या मिश्रणात मिक्स करा.
Social Media
मिश्रणात ओवा, हळद,मसाला मिक्स करून पाणी घालून एकजीव करावे
पातळ कापडावर मिश्रण पाणी लावून थापावे. नंतर गॅसवर गरम तव्यावर हे मिश्रण अलगद टाकावे. वरतून थोडे तेल सोडावे.
दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्या अशाप्रकारे भाजणीचे थालीपीठ सर्व्हसाठी तयार आहे.