Siddhi Hande
पिझ्झा हा पदार्थ लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडतो
तुम्ही घरच्या घरी ओव्हनशिवाय पिझ्झा बनवू शकतात.
सर्वात आधी तुम्हाला एका भांड्यात २ कपभर सर्व पीठ घ्यायची आहेत. त्यात १ टीपस्पून Yeast टाकायचं आहे.
यानंतर एक टीपस्पून साखर, अर्धा टीपस्पून मीठ आणि ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे.
यानंतर त्यात गरम पाण टाकायचं आहे. हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. त्यावर रुमाल टातून १- २ तास झाकूण ठेवायचे आहे.
यानंतर तुम्हाला या पीठाला लाटून घ्यायचं आहे. तो आपोआप मोठा होईल.तुमच्या मनाप्रमाणे त्याला आकार द्या.
यानंतर नॉन स्टीक पॅन मध्यम आचेवर गरम करुन घ्या. त्यावर थोडसं तेल लावा.
यानंतर तुम्ही केलेला पिझ्झाचा बेस त्यावर ठेवा. ३-४ मिनिट दोन्ही बाजूने भाजून घ्या.
यानंतर यावर तुम्ही तुम्हाला आवडतात ते सॉस लावून घ्या.
यावर कांदा, टॉमेटो,ऑलिव्ह, मशरुम, पनीर हे सर्व टाका. त्यानंतर चीझ टाका.
हा पिझ्झा तुम्ही परत पॅनमध्ये ठेवा. ७-८ मिनिटे कमी आचेवर शिजवून घ्या.
यानंतर तुम्ही पिझ्झाचे छान तुकडे करुन खाऊ शकतात.