Priya More
सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फणस विकायला आला आहे.
फणसाचे गर खाताना त्याच्या आतमध्ये असणाऱ्या बिया या बऱ्याचदा फेकून दिल्या जातात किंवा शिजवून खाल्ल्या जातात.
फणसाच्या बियांची भाजी देखील बनवली जाते. ही खूपच टेस्टी लागते आणि झटपट तयार होते.
यासाठी फणसाच्या बिया घेऊन त्या वरवंट्याने ठेचून घ्यायच्या.
या ठेचलेल्या बिया कुकरमध्ये पाणी आणि थोडे मीठ टाकून शिजवून घ्यायच्या.
शिजलेल्या फणसाच्या बियांवरील साल काढून घ्यायची.
या बियांवर मीठ, मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर, आद्रक लसून पेस्ट लावायची.
त्यानंतर त्यावर कडीपत्त्याची चिरून घेतलेले पानं, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ टाकायचे.
या बियांना सर्व मसाले चोळून घ्यायचे. त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून त्यावर या मसाला लावलेल्या बिया टाकायच्या.
ही फणासाची भाजी खूपच टेस्टी लागले. घरातील सर्वजण आवडीने खातील.