Sakshi Sunil Jadhav
कोबीची भाजी लहान मुलांसाठी खूप कंटाळवाणी वाटत असते. म्हणूनच आपण त्यात त्यांच्या आवडीच्या भाज्या घालून मस्त पौष्टीक चमचमीत भाजी बनवणार आहोत. पुढे याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
कोबी, बटाटे, मिरच्या, तेल, मटार, हळद, लाल तिखट, मीठ, आलं, साखर, कडीपत्ता इत्यादी साहित्य चमचमीत भाजीसाठी पुरेसे आहे.
सर्वप्रथम कोबी बारिक चिरा किंवा तुम्ही उभ्या आकारात किसू शकता. बटाटा आणि मटार व्यवस्थित सोलून स्वच्छ धुवून घ्या.
आता हिरव्या मिरच्या बारिक चिरा, कडीपत्याची पानं आणि किसून ठेवा. यामुळे सुंगध आणि चव जास्त वाढेल.
एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी घालून तडतडू द्या. मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता, किसलेलं आलं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परतून घ्या.
फोडणीत सर्वप्रथम बटाटा आणि मटार घालून मऊ होईपर्यंत परता. हे पाऊल भाजीच्या चवीसाठी महत्त्वाचे आहे.
बटाटा-मटार शिजल्यानंतर चमचाभर साखर, हळद आणि लाल तिखट घाला. मसाले व्यवस्थित मिसळा. फोडणीत मीठ टाकून ढवळा आणि त्यानंतर कोबी घाला.
कोबी शिजेपर्यंत झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजी शिजवा. कोबी लगेच शिजते त्यामुळे जास्त वेळ ठेवू नका.
भाजी शिजल्यावर झाकण काढून थोडंसं परता. यामुळे भाजी खमंग आणि जास्त रुचकर होते.