ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्ट्रॉबेरी पुडींग हे एक लोकप्रिय डेजर्ट आहे जे ताज्या स्ट्रॉबेरीज आणि फ्रेश क्रिम पासून बनवले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही डिश आवडते.
फ्रेश स्ट्रॉबेरीज, दूध, साखर, कॉर्नस्टार्च, व्हॅनीला एसेंस आणि फ्रेश क्रिम इत्यादी साहित्य लागते.
स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवून कापून घ्या आणि काही स्ट्रॉबेरी सजावटीसाठी बाजूला काढून ठेवा.
एका भांड्यात दूध घ्या. ते गरम करण्यास ठेवा त्यात साखर आणि कॉर्नस्टार्च मिक्स करा. हे मिश्रण जाड होईपर्यंत शिजवून घ्या.
आता मिश्रणात व्हॅनीला एसेंस मिक्स करा आणि काही वेळ अजून शिजवून घ्या. शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रणाला थंड करण्यास ठेवून द्या.
तयार केलेल्या मिश्रणात स्ट्रॉबेरीज मिक्स करा आणि चांगले फेटून घ्या. पुडिंगला मोल्ड्समध्ये टाका आणि फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
ठंड पुडिंगला फ्रेश क्रिम आणि स्ट्रॉबेरीज किंवा वेगळ्या अन्य बेरीजने सजवा.
तुमचे स्ट्रॉबेरीज पुडींग तयार आहे. मनसोक्त पुडिंग खाण्याचा आनंग घ्या.