ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
४ ब्रेडचे स्लाइस, बारीक चिरलेला कांदा, मोहरी, हळद, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि तेल
सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करा. यामध्ये मोहरी घाला.
आता, यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घाला. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर हळद घाला.
यामध्ये बारीक तुकडे केलेले ब्रेड घाला. आणि यावरुन मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
ब्रेड पोहा २ मिनिटांसाठी शिजू द्या. आणि चिपकू नये म्हणून मिश्रण ढवळत राहा.
गॅस बंद करा. आणि कोथिंबीराने सजवा तुमच्या चवीनुसार वरुन लिंबाचा रस घाला.
टेस्टी अन् चटपटीत ब्रेड पोहा तयार आहे. संध्याकाळी चहासोबत ब्रेड पोहाचा आस्वाद घ्या.