Vegetable Poha: १५ मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी व्हेजिटेबल पोहा, रेसिपी नोट करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

१ कप पोहे, मिक्स भाज्या (बीन्स, गाजर, शिमला मिरची आणि वाटाणे), १ बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर,कढीपत्ता, मोहरी , हळद, मीठ, साखर, लिंबाचा रस, शेव आणि तेल.

poha | yandex

फोडणी द्या

एका कढईत तेल गरम करा. यात सुकलेली लाल मिरची, मोहरी कढीपत्ता, कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.

poha | yandex

भाज्या

आता, यामध्ये मिक्स भाज्या घाला आणि त्या मऊ होईपर्यंत शिजवा. चव वाढवण्यासाठी शिजवताना थोडे मीठ घाला.

poha | yandex

पोहे धुवून घ्या

पोहे स्वचछ धुवून एका ताटात मोकळे ठेवा, नंतर कढईमध्ये घालून मिक्स करुन घ्या.

poha | yandex

मीठ घाला

पोहेमध्ये चवीनुसार मीठ घाला आणि चिमूटभर साखर आणि हळद घाला. सर्वकाही व्यवस्थित मिक्स करा. आणि दोन मिनिटांसाठी शिजवा.

poha | yandex

लिंबाचा रस

यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. यामध्ये लिंबाचा रस घालून पोहे हलक्या हाताने मिसळा.

Lemon Juice | yandex

व्हेजिटेबल पोहे तयार आहे

हेल्दी आणि टेस्टी व्हेजिटेबल पोहा तयार आहे. शेव आणि चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. आणि गरमागरम सर्व्ह करा.

poha | yandex

NEXT: वनडे ट्रिपचा प्लान करताय? मग बोरीवलीमधील 'या' ठिकाणांना एकदा भेट द्याच

Hill Station | Ai
येथे क्लिक करा