ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर मुंबईजवळच वनडे ट्रिपचा प्लान करत आहात, तर बोरीवली हे परफेक्ट ठिकाण आहे.
बोरीवलीमध्ये फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. येथे तुम्ही बीचेच, धार्मिक स्थळे, उद्यान तसेच नॅशनल पार्कला भेट देऊ शकता.
तुम्ही येथे कुटुंबासह भेट देऊ शकता. येथे वेगवेगळ्या प्रजातीचे वनस्पती, प्राणी तसेच वन्यजीव पाहण्याची संधी मिळते.
संजय गांधी नॅशनल पार्कमध्येच तुम्ही कान्हेरी लेणी पाहू शकता. या लेण्यांमध्ये बुद्ध आणि बोधिसत्वांचे अनेक कोरीवकाम, शिलालेख आणि शिल्पे आहेत. येथे बस किंवा टॅक्सीने जाता येते.
मुंबईतील इतर बीचेसच्या तुलनेत या बीचवर गर्दी कमी असते. हे बीच शांत आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
बोरीवलीजवळच ग्लोबल विपश्यना पॅगोडा आहे. या भव्य पॅगोडाच्या माध्यमातून भगवान बुद्धाच्या शिकवणींच्या संक्लपनेची ओळख करुन देतो.
जर तुम्हाला थीम पार्क किंवा वॉटर पार्कला भेट द्यायचे असेल तर एसेलवर्ल्डला भेट द्यायला विसरु नका.