Manasvi Choudhary
पावसाळा म्हटलं की गरमा - गरम चहा हा झालाच पाहिजे. बरेचजण पिकनीकचा प्लान देखील करतात.
पावसाळ्यात थंड वातावरणात आल्याचा फक्कड चहा तर झालाच पाहिजे.
पावसाळ्यात मसालेदार फक्कड चहा प्यायल्याने मूड फ्रेश होतो.
टपरीसारखा फक्कड चहा घरी बनवण्याची रेसिपी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
सर्वातआधी चहा पावडर, साखर,दूध, वेलची, तमालपत्र,लवंग, आल्याचा तुकडा हे साहित्य तयार ठेवा.
गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळून घ्या.
पाण्याला उकळ आली की त्यात वेलची, तेजपत्ता बारीक करून मिक्स करा.
यानंतर या मिश्रणात साखर आणि चहापावडर मिक्स करा.
दूध घालून चहा साधारणपणे ३ ते ५ मिनिटे चांगला उकळून घ्या.
अशापद्धतीने घरच्या घरी गरमागरम टपरीसारखा फक्कड चहा तयार होईल.