Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रान भाज्या बाजारात येत असतात.
पुढे आपण टाकळ्याची हिरव्या मिरच्यांमधली सगळ्यात टेस्टी भाजी तयार करणार आहोत.
मूग डाळ, कांदा, लसूण, हिरवी मिरची, हळद, मोहरी, जिरं, हिंग, मीठ, तेल, आला नारळ
टाकळ्याची भाजी स्वच्छ धुवून निवडून, चिरून घ्या. कांदा आणि मिरच्या बारिक करा.
मूग डाळ भिजत ठेवा आणि नारळ खवून घ्या.
एका कढईत तेल गरम करून जिरं-मोहरी, हिंग, मिरची आणि लसणाची फोडणी द्या.
साहित्यात कांदा घालून परतून घ्या. मग त्यात हळद, मीठ घाला.
आता फोडणीत डाळ आणि भाजी घालून घ्या. आणि त्यावर झाकण ठेवा.
भाजीला गॅस बंद करून वाफवा. ही भाजी गरमा गरम भाकरीसोबत सर्व्ह करा.