Siddhi Hande
रोज जेवताना नेहमीची डाळ खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही गोडी डाळ ट्राय करा. गोडी डाळ चवीला खूप मस्त लागते.
तूर डाळ, मूग डाळ, हळद, तेल, मोहरी, मेथी, हिंग, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, लवंग, हिरवी मिरची, टॉमेटो, कोथिंबीर, गूळ, कोकम, लिंबाचा रस
सर्वात आधी तुम्हाला डाळ शिजून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरच्या डब्ब्यात तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे.
कुकरच्या भांड्यात हळद आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे. कुकरच्या ३-४ शिट्ट्या घ्या. डाळ चांगली शिजायला हवी.
यानंतर तुम्हाला शिजलेली डाळ रवी किंवा ब्लेंडरने छान एकजीव करायची आहे.
एका कढईत तेल किंवा तूप टाका. त्यात मोहरी,जिरे, मेथी टाकून फोडणी द्या. त्यात हिंग, सुकी मिरची, लवंग, दालचिनी आणि कढीपत्ता टाका. यात मिरची टाकून फोडणी द्या.
यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टॉमेटो घालून शिजवून घ्या. यात हळद, लाल तिखट आणि धना पावडर टाकून मिक्स करा.
यानंतर या फोडणीत शिजलेली डाळ टाका. त्यात कोकम किंवा चिंचेचा कोळ टाकून मिक्स करा.
यानंतर डाळीत मीठ आणि थोडं पाणी टाकून छान मिक्स करुन घ्या. यानंतर डाळ ५-१० मिनिटे उकळून घ्या.
डाळ उकळल्यानंतर त्यावर लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.