Manasvi Choudhary
सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
यानुसार सफरचंदाची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
सफरचंद चटणी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सफरचंद चटणी बनवण्यासाठी सफरचंद, गूळ, मनुके, मीठ, व्हिनेगर, लाल मिरच्या, मोहरी, लिंबाचा रस, लिंबाची साल, कांदा, लसूण, सुंठपूड, लाल तिखट हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम सफरचंदाची साल, बिया काढून घ्या. लाल मिरच्या व्हिनेगर मध्ये भिजत घालून ठेवा.
यानंतर कांदा, लसूण बारीक चिरून घ्या. गॅसवर एका भांड्यामध्ये सफरचंदाचा किस, लाल मिरची, मसाला, मोहरी, गूळ, लिंबाची साल, सुंठपूड एकत्र परतून घ्या.
नंतर संपूर्ण मिश्रणाला छान ढवळून घ्या. अशाप्रकारे सफरचंदाची आंबट- गोड चटणी सर्व्हसाठी तयार आहे.
काचेच्या बरणीमध्ये ही चटणी तुम्ही आठवडाभर खाऊ शकता.