Manasvi Choudhary
सायंकाळी नाश्त्याला अनेकांना चटपटीत पदार्थ खायला आवडतात. अनेकजण हेल्दी सँडविच खातात. यासाठी आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सँडविच कसा बनवायचा हे सांगणार आहे.
सँडविच बनवण्यासाठी शिमला, गाजर, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, काळे मीठ, मसाला, जिरा पावडर, कोथिंबीर, मीठ, ब्रेड, दही हे साहित्य घ्या.
सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम सिमला मिरची, कांदा, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची या भाज्या बारीक कापा.
या भाज्यामध्ये थोडे दही मिक्स करा. नंतर त्यात काळे मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर, जिरा पावजर मिक्स करा. नंतर या संपूर्ण मिश्रणात हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. चवीनुसार थोडेसे मीठ घाला आणि मिश्रण परतून घ्या.
संपूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात बटर घाला अशाप्रकारे सँडविच मसाला तयार होईल.
दोन ब्रेड स्लाईस घ्या त्यांना बटर लावा आणि तव्यावर भाजून घ्या. नंतर या ब्रेड स्लाईसवर तयार सँडविच मसाला टाका आणि गॅसवर तव्यावर हे सँडविच चांगले भाजून घ्या.