ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही तरी चटपटीत खावसं वाटतंय, मग घरीच बनवा चटपटीत स्ट्रीट स्टाइल दही पुरी. ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
उकडलेले बटाटे, पानीपुरीची पुरी, दही, जीरा पावडर, चाट मसाला, कांदा, हिरवी चटणी, चिंच आणि गुळाची चटणी, शेव, काळे मीठ आणि कोथिंबीर
सर्वप्रथम कांदा बारीक चिरुन घ्या. आणि उकडलेल्या बटाट्याला मॅश करुन घ्या.
एका ताटात पुरी घ्या. पुरीमध्ये लहान छिद्र करुन यामध्ये बटाटा, कांदा, मीठ, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घाला.
फेटलेली दही पुरीवर दही घाला. तसेच यावर काळे मीठ, जीरा पावडर आणि चाट मसाला घाला.
आता, यावर शेव आणि कोथिंबीर घालून सजवा.
चटपटीत दही पुरी तयार आहे. कुटुंबासोबत दही पुरीचा आनंद घ्या.