Surabhi Jayashree Jagdish
शेवपुरीची खरी मजा तिच्या चटपटीत, झणझणीत तिखट चटणीमध्ये असते. जर तुम्हाला ही चटणी घरी बनवायची असेल तर तुम्ही अगदी सहज घरच्या घरी तयार करू शकता.
योग्य प्रमाणात मसाले, लसूण आणि मिरची वापरली तर चटणीला परफेक्ट स्ट्रीट-स्टाइल स्वाद येतो. ही चटणी शेवपुरीसोबतच पाणीपुरी, दहीपुरी आणि भेळीसाठीही उपयोगी पडते.
८–१० सुक्या लाल मिरच्या कोमट पाण्यात १५–२० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे मिरच्या मऊ होतात आणि चटणी गुळगुळीत बनते. भिजवलेलं पाणी थोडंसं बाजूला ठेवा.
६–७ पाकळ्या लसूण सोलून घ्या. त्यात १ चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग ठेवा. हे घटक चटणीला खास उग्र चव देतात.
भिजवलेल्या मिरच्या, लसूण, जिरं मिक्सरमध्ये घाला. थोडं भिजवलेलं पाणी घालून बारीक वाटा. चटणी फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
अर्धा चमचा चिंचेचा कोळ घाला. चिमूटभर गूळ किंवा साखर टाका, फार गोड करू नका. यामुळे तिखटपणाला छान बॅलन्स येतो.
चवीनुसार मीठ घाला. हवं असल्यास थोडं काश्मिरी लाल तिखट घाला. यामुळे रंग आणि स्वाद दोन्ही छान येतात.
तयार चटणी काचेच्या डब्यात भरा. यामुळे चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास ५–६ दिवस टिकते. शेवपुरीवर घालताना थोडी पातळ करून वापरू शकता.