Siddhi Hande
चायनीज भेळ हा पदार्थ सर्वांनाच आवडतो.
तुम्ही घरच्या घरी अवघ्या १० मिनिटांत चायनीज भेळ बनवू शकतात.
चायनीज भेळसाठी सर्वप्रथम नूडल्स पाण्यात उकळवून घ्या.
त्यानंतर नूडल्सवर थोडसं थंड पाणी टाका.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात नूडल्स टाकून तळून घ्या.
आता घरात असलेल्या भाज्या कापून घ्या. त्यात शिमला मिरची, कोबी, कांदा या भाज्या असायल्या हव्यात.
यानंतर नूडल्स घ्या. त्यावर सर्व भाज्या टाका. त्यानंतर शेजवान सॉस टाका.
यानंतर मीठ टाकून सर्वकाही मस्त मिक्स करुन घ्या. तुमची चटपटीत चायनीज भेळ तुम्ही खाऊ शकतात.