Street style pav bhaji recipe: घरच्या घरी कशी बनवाल स्ट्रीट स्टाईल पाव भाजी? पाहा सोपी रेसिपी

Surabhi Jayashree Jagdish

पाव भाजी

भारतात पाव भाजी खूप आवडीने खाल्ली जातो. मुंबईत तर लोक ही डिश मोठ्या आवडीने खातात.

स्ट्रिट स्टाईल पाव भाजी

स्ट्रिट स्टाईल पाव भाजी प्रत्येकाला आवडते. पण ती भाजी घरात कशी बनवावी हा प्रश्न असतो. खरं तर ती बनवणं अगदी सोपं आहे. थोडी तयारी केली की स्वादिष्ट भाजी तयार होते.

भाज्या उकडा

सर्वप्रथम बटाटे, फ्लॉवर, मटार आणि गाजर उकडून घ्या. ही भाजी पाव भाजीचा बेस असते. उकडलेली भाजी मऊसर होते.

बटर टाका

एका कढईत बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा परता. नंतर आलं-लसूण पेस्ट घालून चांगलं परता.

रंग आणि चव

त्यानंतर टोमॅटो घालून व्यवस्थित मिसळा. पाव भाजी मसाला, लाल मिरची आणि मीठ घाला. यामुळे भाजीला रंग आणि चव येते.

भाज्या घालून मॅश करा

आता यामध्ये उकडलेल्या भाज्या घालून मॅश करा. भाजी घट्टसर होईपर्यंत शिजवा. ही स्टेप चविष्ट भाजीसाठी महत्त्वाची आहे.

तयार आहे पाव भाजी

पावांना बटरमध्ये शेकून घ्या. गरमागरम भाजीसोबत पाव सर्व्ह करा. तुमची स्वादिष्ट पाव भाजी तयार आहे.

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा