Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

Surabhi Jayashree Jagdish

लागणारे साहित्य

मोमोजची लाल चटणी बनवण्यासाठी सुकी लाल मिरची, लसूण, टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी, साखर आणि चवीनुसार मीठ लागते. चटणीची चव आणि रंग उत्तम येण्यासाठी ताजं साहित्य वापरणं महत्त्वाचं आहे.

Quick chutney recipe | saam tv

सुकी लाल मिरची भिजवा

सर्वप्रथम सुकी लाल मिरची किमान दोन तास पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे मिरची मऊ होते आणि वाटताना एकसारखी पेस्ट तयार होते. भिजवल्यामुळे चटणीला आकर्षक लाल रंग आणि चांगला पोत मिळतो.

Red chutney recipe | saam tv

टोमॅटो उकळून घ्या

टोमॅटो स्वच्छ धुवून सुमारे पाच मिनिटं उकळत्या पाण्यात शिजवा. यामुळे टोमॅटो मऊ होतात आणि त्यांची साल सहज निघते. मऊ टोमॅटोमुळे चटणी अधिक गुळगुळीत आणि चविष्ट बनते.

Homemade momos sauce | saam tv

साहित्य मिक्सरमध्ये वाटा

उकडलेले टोमॅटोचे मोठे तुकडे करून भिजवलेल्या लाल मिरचीसोबत मिक्सरमध्ये घाला. त्यात काळी मिरी, साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण वाटा. सुरुवातीला हे मिश्रण एकसारखे आणि मऊ होईपर्यंत ब्लेंड करा.

Spicy chutney | saam tv

लसूण घालून पुन्हा ब्लेंड करा

यानंतर या मिश्रणात लसणाच्या पाकळ्या घाला. लसूण घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण बारीक वाटून घ्या. यामुळे चटणीला खास तिखट, झणझणीत आणि सुगंधी चव मिळते.

Tomato garlic chutney | saam tv

चटणीचा थिकनेस

ही चटणी खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावी याची काळजी घ्या. मोमोज चटणीत बुडवल्यावर त्यावर हलका थर बसावा इतपतच तिची जाडी असावी. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून इच्छित कन्सिस्टन्सी मिळवू शकता.

Momos dip | saam tv

ऑलिव्ह ऑइल

चटणी तयार झाल्यावर त्यामध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल घाला. त्यामुळे चटणीची चव अधिक खुलते. ही तयार लाल चटणी गरमागरम मोमोजसोबत सर्व्ह करा आणि रेस्टॉरंटसारख्या चवीचा आनंद घ्या.

Restaurant style chutney | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Excessive sweating | saam tv
येथे क्लिक करा