Manasvi Choudhary
आजकाल मोमोज खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
व्हेज, नॉनव्हेज मोमोज खायला चवदार असतात.
मात्र घरी मोमो केल्यानंतर त्याची चटणी कशी बनवायची? असा प्रश्न पडतो.
मोमोज चटणी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मोमो चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, लसूण, सुकी लाल मिरची, आले, व्हिनेगर, लिंबाचा रस, मीठ, साखर, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर टोमॅटो आणि सुक्या लाल मिरच्या पाण्यात उकळून घ्या.
दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅनमध्ये तेलामध्ये लसूण परतून घ्या.
आता मिक्सरमध्ये टोमॅटो, लाल मिरच्या, लसूण, मीठ, साखर हे एकत्र बारीक करून घ्या.
या मिश्रणाला जिरे आणि मोहरीची फोडणी देखील देऊ शकता.
अशाप्रकारे चमचमीत मोमो चटणी सर्व्हसाठी तयार झाली आहे.