Manasvi Choudhary
पेरू आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.
थंडीच्या दिवसात बाजारात गेल्यानंतर मसाला पेरू पाहून तोंडाला पाणी सुटते.
मात्र आरोग्यदायी, चटपटीत मसाला पेरू घरी बनवण्यासाठी अत्यंत सोपी रेसिपी आहे.
मसाला पेरू बनवण्यासाठी पेरू, जीरे मोहरी, बडिशेप पावडर, लोणचे मसाला, हळद, हिंग, लाल तिखट, मीठ हे साहित्य घ्या.
मसाला पेरू बनवण्यासाठी सर्वप्रथम पेरू स्वच्छ धुवून घेणे.
नंतर पेरूचे दोन भाग करून त्याचे आडवे आणि उभे असे काप करावेत.
एका भाड्यात हे पेरूचे काप टाकावेत नंतर यामध्ये लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस, चाट मसाला, आमचूर पावडर घाला.
भाड्याला झाकण लावून ते व्यवस्थित ढवळून घ्या जेणेकरून मिश्रण एकजीव होईल.
अशाप्रकारे मसाला पेरू खाण्यासाठी तयार आहे.