Manasvi Choudhary
चटपटीत मसाला कैरी खायला सर्वांनाच आवडते.
बाजारातून कैरी आणल्यानंतर त्यावर मीठ- मसाला टाकून खाणं मज्जाच असते.
मात्र स्ट्रीट स्टाईल मसाला कैरी घरी कशी बनवायची रेसिपी जाणून घ्या.
साधारण पिकलेली कैरी, लाल तिखट मसाला. हळद, जिरे पावडर, काळे मीठ, पिठी साखर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्या, नंतर कैरीच्या बारीक बारीक फोडी करा.
एका भांड्यात या सर्व फोडी टाका नंतर यामध्ये अंदाजानुसार मसाला, हळद, काळे मीठ, जिरे पावडर आणि पिठी साखर घाला.
नंतर हे सर्व मिश्रण असलेल्या भांड्याला झाकण लावा आणि ढवळून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी मसाला कैरी तयार आहे.