Siddhi Hande
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मंच्युरियन आवडतात. मंच्युरियन रेसिपी ही खूप सोपी आहे.
तुम्ही घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल मंच्युरियन रेसिपी बनवू शकतात.
मंच्युरियन बनवण्यासाठी सर्वात आधी कोबी एकदम बारीक कापून घ्या.
एका भांड्यात कोबी, कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
या मिश्रणाचे लहान गोळे बनवून घ्या. त्यानंतर तेलात छान कुरकुरीत तळून घ्या.
यानंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाका.
त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट परतून घ्या.
यात सॉया सॉस, टॉमेटो सॉस आणि इतर सॉस टाकून मिक्स करा.
यानंतर त्यात कॉर्नफ्लोअरचे मिश्रण टाकून हळूहळू मिक्स करा. हा सॉस जरा घट्ट होऊ द्या.
यानंतर त्यात मंच्युरियन गोळे टाकून मिक्स करा.त्यानंतर ग्रेव्हीसोबत मिक्स करा.