Shreya Maskar
घरीच संध्याकाळच्या नाश्त्याला खाण्यासाठी बीटरूटचे चिप्स बनवा.
बीटरूटचे चिप्स बनवण्यासाठी बीटरूट, ऑलिव्ह ऑईल, काळे मीठ, काळी मिरी, चाट मसाला इत्यादी साहित्य लागते.
बीटरूटचे चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम बीटरूट पूर्णपणे धुवा आणि पातळ कापून घ्या.
बाऊलमध्ये पाणी गरम करून त्यात बीटरूचे तुकडे टाका. म्हणजे अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
कॉटनच्या कापड्यावर चिप्स पसरवून नीट वाळवून घ्या.
बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल, काळे मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घालून बीटरूटचे तुकडे छान घोळवून घ्या.
तेल गरम करून त्यात बीटरूटचे चिप्स खरपूस तळून घ्या.
तुम्ही यात पेरी-परी मसाला देखील टाकू शकता.