Siddhi Hande
फ्राईड राईस हा पदार्थ एकदम झटपट बनतो आणि एकदम चविष्ट लागतो.
फ्राईड राईससाठी सर्वात आधी भात शिजवून घ्या.
एका बाजूला कांदा, कोथिंबीर, गाजर, शिमला मिरची आणि कांद्याची पात कापून घ्या.
यानंतर एका कढईत तेल गरम करा. त्यात आलं लसूण पेस्ट मस्त फ्राय करा.
यानंतर कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कोबी टाका. हे सर्व २-३ मिनिटे परतून घ्या.
यानंतर त्यात सोया, सॉस, व्हिनेगर, काळी मिरी पावडर आणि मीठ टाका.
यानंतर तुम्ही यात भात घालून छान मिक्स करा.
यानंतर भातावर छान कोथिंबीर गार्निश करुन सजवा. हा भात एकदम झटपट ५ मिनिटांत बनतो.