Siddhi Hande
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना चायनीज पदार्थ खायला आवडतात. चायनीज भेळ तर लहान मुलांना खूपच आवडते.
चायनीजचे पदार्थ लहान मुलांसाठी चांगले नसतात त्यामुळे तुम्ही घरीच चायनीज भेळ बनवू शकतात.
नूडल्स, तेल, कॉर्नफ्लॉर, कोबी, गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात, शेजवान ,सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस, टॉमेटो केचअप, लसूण, आलं, मीठ
सर्वात आधी तुम्हाला नूडल्स पाण्यात थोडं मीठ टाकून ३-४ मिनिटे उकळून घ्यायचे आहे. नूडल्स जास्त शिजवू नका.
यानंतर नूडल्समधील पाणी काढून घ्या. त्यामध्ये कॉर्नफ्लोर मिक्स करा.
यानंतर नूडल्स गरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
यानंतर तुम्हाला कढईत तेल गरम करायचे आहे. त्यात बारीक चिरलेलं आलं लसूण टाकायचे आहे.
यामध्येच बारीक चिरलेला कोबी, गाजर, शिमला मिरची एक मिनिटभर परतून घ्या.
यानंतर या भाज्यांमध्ये शेजवान सॉस, सोया सॉस,टॉमेटो केचअप आणि थोडं मीठ टाका.
यानंतर गॅस बंद करा. त्यात नूडल्स टाका. त्यावर बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून नीट मिक्स करा.