Sakshi Sunil Jadhav
पावसाळा असो वा नसो चाटचे नाव ऐकताच तोडांला पाणी सुटते.
आज आपण घरच्या घरी हिरव्या चटणीची चटपटीत चाटसारखी कुरकुरीत भेळ तयार करणार आहोत.
कुरमुरे, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, मीठ, उकडलेला बटाटा, चाट मसाला, लिंबाचा रस, साखर, हिरवी मिरची, शेंगदाणे, बारिक शेव, आलं इ.
सर्वप्रथम कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे, आलं, मीठ आणि पाणी घालून वाटण करा.
आता कांदा , टोमॅटो, काकडी, बटाटा बारिक चिरा, शेंगदाणे भाजून घ्या.
आता एक मोठे भांडे घ्या. त्यात कुरमूरे घ्या.
पुढे सगळे साहित्य त्यामध्ये मिक्स करून घ्या. मग त्यावर चटणी आणि साखरेचे पाणी मिक्स करून भेळ बनवा.
तुम्ही यात फरसाण सुद्धा मिक्स करू शकता. तयार आहे चटपटीत भेळ.