Saam Tv
फणसाचे गरे खाल्यानंतर त्यांच्या बियांपासून बनवा कोकणातली पारंपारिक भाजी.
आठळ्या, ओलं खोबरं, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, हळद, मीठ, जिरं, हिंग, तेल, कोथिंबीर इ.
रात्री आठळे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यांना एका कुकरमध्ये 2 शिट्या होईपर्यंत उकडून घ्या.
आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी टाकून जाडसर वाटण करून घ्या.
एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरं, हिंग आणि हळद टाका.
फोडणीत उकडलेले आठळे आणि तयार खोबरं वाटण घालून परतून घ्या. मीठ घालून 5-6 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
शेवटी कोथिंबीर घालून गरम गरम भाजी भात, पोळी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.
अधिक चवदार हवी असल्यास खोबरं थोडं भाजूनही वाटू शकता.