Saam Tv
घरच्या वरण भातासोबत चिमुटभर का होईना चटणी किंवा लोणचं हवचं असतं.
आज आपण अशीच एक झणझणीत आणि फक्त १० मिनिटात तयार होणारी रेसिपी करणार आहोत.
शेंगदाणे, लाल तिखट, जिरे, तेल, लसणाच्या पाकळ्या, मीठ
सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्या. मग त्यांना सोलून घ्या.
लसूण शेंगदाण्यांपेक्षा कमी घ्या. आणि तेही सोलून घ्या.
आता एका तव्यात तेल गरम करा त्यात शेंगदाणे पुन्हा परतून घ्या.
शेंगदाण्यांमध्येच तुम्ही जिरं, लाल तिखट, मीठ घाला. फोडणी करपून देऊ नका. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या तळून घ्या.
आता सगळं मिश्रण थंड होऊ द्यात. पुढे एका मिक्सरमध्ये साहित्याचं जाडसर वाटण करून घ्या. त्यामध्ये शेवटी चवीनुसार मीठ खायला विसरू नका.
चला तयार आहे तुमची झणझणीत शेंगदाण्यांची चटणी. तुम्ही पोळी, पराठा, भाकरी, वरण भातासोबत सर्व्ह करू शकता.