Saam Tv
इडली चिली ही रेसिपी चवीला उत्तम आहेच. त्यासोबत बनवायला सुद्धा सोपी आहे.
तयार इडल्या, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरपूड, पाणी, तेल, लसूण, आलं, हिरवी मिरची, कांद्याची पात, शिमला मिर्ची, साखर, मिरपूड, चिली सॉस, सोया सॉस.
एका वाटीत मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरपूड, पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा.
आता कढईत तेल गरम करून इडलीचे तुकडे पीठात बुडवून क्रिस्पी होईपर्यंत तळा.
दुसऱ्या कढईत तेल गरम करा. त्यात लसूण, मिरची, कांद्याची पात, शिमला परता.
आता भाज्यांमध्ये मीठ, साखर, सोया सॉस, रेड चिली सॉस, काळी मिरी घालून परता.
तयार भाज्यांमध्ये कॉर्नफ्लोअरचे पाणी घालून शिजवा. मग त्यात इडल्या घालून २ मिनिटे परता.
आता गरमा गरम इडल्या शेजवान सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.